Ad will apear here
Next
‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही वेगाने वाढणारी कंपनी
मुंबई : या वर्षी ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ने नफ्यात ८२ टक्क्यांनी वाढ करून ‘एलआयसी’ला मागे टाकले आहे. २०१७मधील आर्थिक वर्षात ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’चे ‘रिटेल प्रीमियम कलेक्शन’ ४०३ कोटी रुपये एवढे झाले आहे. नवीन व्यवसायातून कंपनीला या वर्षी १८१ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. २००९मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनीने सर्वांत जास्त फायदा या वर्षी मिळवला आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’तर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

‘आयआरडीए’नुसार, साधारणतः लाइफ इन्शुरन्स कंपनी वर्षात २६ टक्के वाढ करू शकते. ‘एलआयसी’ने एकूण ३९ टक्के वाढ केली आहे. व्यक्तिगत प्रकारात ८२ टक्क्यांच्या वाढीसह ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ने अव्वल नंबर पटकावला असून, ‘टाटा एआयए’ने ७३ टक्के, तर ‘फ्युचर जनरली’ने ४४ टक्के आणि ‘एसबीआय लाइफ’ने ३९ टक्के वाढ केली आहे. ‘रिलायन्स लाइफ’ला २३ टक्के तोटा झाल्याचे सांगण्यात आले आहे.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZAKBB
Similar Posts
एलआयसी ऑफ इंडियाच्या एकूण संपत्तीत वाढ मुंबई : ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी ऑफ इंडिया) या भारतातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने सप्टेंबर २०१७ अखेरीपर्यंतच्या सहा महिन्यांतील ऑडिटेड आकडेवारी जाहीर केली आहे. कॉर्पोरेशनने सप्टेंबर २०१७च्या अखेरीपर्यंत १,४८,०३७ कोटी रुपयांचा एकूण प्रीमिअम मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १,३२,२५७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ११
‘एलआयसी’मध्ये आठ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती मुंबई : तब्बल २४ वर्षांनंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मेगा भरती मोहीम जाहीर केली असून, आठ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
‘एलआयसी’चे प्रीमियम भरण्याची सुविधा आता ‘पेटीएम’वर मुंबई : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’च्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या देशातील सर्वांत मोठ्या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या मंचावरून ग्राहकांना आता काही सेकंदात ‘एलआयसी’चा हप्ता भरणे शक्य होणार आहे.
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language